कंत्राटदाराचा वेळखाऊपणा पालिकेच्या रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटदाराचा वेळखाऊपणा पालिकेच्या रडारवर
कंत्राटदाराचा वेळखाऊपणा पालिकेच्या रडारवर

कंत्राटदाराचा वेळखाऊपणा पालिकेच्या रडारवर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः कोपरखैरणे येथे नागरी आरोग्य केंद्र आणि शाळा इमारतीच्या बांधकामातील दिरंगाईप्रकरणी महापालिकेने कंत्राटदारावर कारवाई केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली असून महापालिकेच्या विकासकामांमधील दिरंगाई आणि कामाचा सुमार दर्जा खपवून घेणार नाही, असा संदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.
कोपरखैरणे विभागातील विविध कामांची नुकतीच बांगर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीवेळेस कोपरखैरणे सेक्टर १४ व सेक्टर १६ येथील नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम तसेच श्रमिक नगर येथील शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. कंत्राटदारास वारंवार संधी देऊनही कामात सुधारणा होत नसल्याचे चौकशीअंती समोर आले होते. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या विषयाकडे गांभीर्याने दुर्लक्ष करणाऱ्या मे. ए. ई. इन्फ्रा. प्रा. लि. यांना निविदेतील अटी व शर्तींनुसार काम होत नसल्याने कंत्राट रद्द करण्याचे आदेश बजावले आहेत.
---
अशी झाली कारवाई
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील भूखंड क्रमांक २२ वर बांधण्यात येणाऱ्या नागरी आरोग्य केंद्राकरिता तसेच कोपरखैरणे सेक्टर १६ येथील भूखंड क्रमांक ३८ वर बांधण्यात येत असलेल्या नागरी आरोग्य केंद्राकरिता ६ मार्च २०१९ ते ५ मार्च २०२० या कालावधीसाठी कार्यादेश देण्यात आलेले होते. असे असताना सेक्टर १४ येथील इमारतीचे ८५ टक्के व सेक्टर १६ येथील इमारतीचे ७० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १७ जून २०२२ रोजी या दोन्ही कामांकरिता स्वतंत्ररीत्या अंतिम नोटीस देण्यात आली. तसेच कामात सुधारणा झाली नसल्याने दोन्ही कामे काढून घेऊन समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
---
नवी मुंबई महापालिका नागरिकांना पुरवत असलेल्या सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या असण्यासोबतच त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याकडेही अभियांत्रिकी विभागाने काटेकोर लक्ष देणे अभिप्रेत आहे. याविषयी गांभीर्य न राखता दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे तसेच कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून यापुढील काळात त्यांना अपात्र ठरवण्याचे निर्देश दिले आहेत.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92507 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..