इमारतींच्या रोषणाईसाठी पालिकेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारतींच्या रोषणाईसाठी पालिकेचा पुढाकार
इमारतींच्या रोषणाईसाठी पालिकेचा पुढाकार

इमारतींच्या रोषणाईसाठी पालिकेचा पुढाकार

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेने मरीन ड्राईव्हलगतच्या ३० इमारतींना तिरंग्याची रोषणाई करण्यासाठी पत्र लिहून आवाहन केले होते; परंतु परिसरातील नागरिकांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेनेच रोषणाईसाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. दक्षिण मुंबईतील हेरिटेज इमारती तसेच मरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींवरील रोषणाईसाठी महापालिका सुमारे ८० लाखांचा खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेने मरीन ड्राईव्ह परिसरातील ३० इमारत मालकांना पत्र लिहीत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तिरंग्याची रोषणाई करण्याची विनंती केली होती, परंतु त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेनेच रोषणाई करण्यासाठी निविदा प्रक्रिया जारी केली. त्यानुसार या इमारतींवरील रोषणाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच स्वातंत्र्यदिनापूर्वी दोन दिवस रोषणाईची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान, येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान मरीन ड्राईव्ह परिसर तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघेल, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मुंबईच्या अ विभागातील हेरिटेज इमारतींना तसेच विभागीय कार्यालयालाही तिरंगा रोषणाई करण्यात येणार आहे. मंत्रालय तसेच मरीन ड्राईव्ह परिसरातील झाडे आणि पथदिव्यांचे खांबदेखील तिरंग्याच्या रोषणाईने लखलखणार आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.
---
एअर इंडिया, ट्रायडंटलाही लखलखाट
मुंबईतील प्रसिद्ध इमारतींपैकी असलेल्या एअर इंडियाच्या इमारतीवर लेझर शो करण्यासाठी महापालिकेने टाटा समूहाकडे विचारणा केली होती. त्यानुसार टाटा समूहाने स्वतःहून लेझर शो करण्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच हॉटेल ट्रायडंट व्यवस्थापनाकडून इमारतीला रोषणाई करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92511 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..