रुबेला सिन्ड्रोमग्रस्त बाळाचा मॉरिशस ते नवी मुंबई प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुबेला सिन्ड्रोमग्रस्त बाळाचा मॉरिशस ते नवी मुंबई प्रवास
रुबेला सिन्ड्रोमग्रस्त बाळाचा मॉरिशस ते नवी मुंबई प्रवास

रुबेला सिन्ड्रोमग्रस्त बाळाचा मॉरिशस ते नवी मुंबई प्रवास

sakal_logo
By

रुबेला सिन्ड्रोमग्रस्त बाळाचा मॉरिशस ते नवी मुंबई प्रवास
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : जीवघेणा असा रुबेला सिन्ड्रोम हा हृदयविकार असलेल्या मॉरिशसमधील एका लहान बाळाला नवी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमधील उपचारांमुळे जीवनदान मिळाले आहे. मॉरिशसमध्ये दोन महिने एनआयसीयूमध्ये असलेल्या बाळाच्या तब्येतीत कुठल्याचा प्रकारची सुधारणा झाली नसल्याने मॉरिशसवरून ५ हजार किलोमीटरचा प्रवास करत बाळाचे पालक नवी मुंबईत उपचारासाठी आले होते.
हृदयविकारामुळे या नवजात बाळाला दूधसुद्धा पाजता येत नसल्यामुळे त्याला रक्तसंचय हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यामुळे चार महिन्यांच्या या बाळाला मॉरिशस येथून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. बाळाला जन्मजात रुबेला सिन्ड्रोम असल्याचा संशय होता. त्यामुळे बाळाला जन्मजात डक्टस आर्टेरिओसिस हा हृदयाचा विकार होता. या हृदयाच्या विकाराचा परिणाम म्हणून रक्तसंचय हृदयविकार यासह व्हॉल्युम ओव्हरलोड (द्रव अधिभार) होता. यावेळी हॉस्पिटल्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी वेळेवर निदान करून बाळाच्या हृदयातील विकार बंद करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांवर मात करत अखेर बाळाला नवजीवन मिळवून दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92516 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..