ठाण्यात चोवीस तासात १५ झाडे पडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात चोवीस तासात १५ झाडे पडली
ठाण्यात चोवीस तासात १५ झाडे पडली

ठाण्यात चोवीस तासात १५ झाडे पडली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे शहरातील विविध भागांत मागील २४ तासांत १५ झाडे उन्मळून पडल्याची; तर नऊ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याची घटना घडली आहे; तर दोन झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारींची नोंद पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात झाडे पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे शहरात जुने, जीर्ण झालेले वृक्ष पडण्याच्या घटना घडत असतात. झाडे पडल्यामुळे अनेकदा वाहनांचे नुकसान होते; तर काही वेळेस मनुष्यहानीदेखील झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील वृक्षांची पाहणी करून १०६ वृक्ष धोकादायक म्हणून घोषित केले होते. हे सर्व वृक्ष पालिकेने काढून टाकले होते, पण त्यानंतरही मुसळधार पावसामुळे शहरात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे.

गेल्या महिनाभरात संपूर्ण शहरात शंभरहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शहरात वृक्ष पडण्याचे सत्र थांबले होते; मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढताच वृक्ष उन्मळून पडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १५ वृक्ष उन्मळून पडले आहेत. नऊ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत; तर दोन झाडे धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्याचे पुनर्रोपण करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाला उन्मळून पडलेले वृक्ष पाहणीदरम्यान धोकादायक असल्याचे दिसून आले नव्हते का आणि पडण्याच्या स्थितीत असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी काय उपयोजना केल्या, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92526 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..