श्रावणसरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणसरी
श्रावणसरी

श्रावणसरी

sakal_logo
By

आज मुंबईत ‘सकाळ श्रावणसरीं’ची बरसात
रंगीबेरंगी कार्यक्रमाबरोबरच स्पर्धा अन् गप्पांची मेजवानी

मुंबई, ता. ११ ः उत्सवाच्या आणि उत्साहाच्या अशा श्रावण महिन्यानिमित्त ‘सकाळ वृत्तपत्र समूह’ सखी-मैत्रिणींसाठी गार्निअर ब्लॅक नॅचरल्स प्रेझेंट्स ‘सकाळ श्रावणसरी’ कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘स्टार प्रवाह’च्या सेलिब्रेटींबरोबर गप्पांसोबतच सम्राज्ञी स्पर्धा, मराठमोळी फॅशन वॉक स्पर्धा आणि उखाणा स्पर्धेचा आनंद सहभागी स्पर्धकांना घेता येणार आहे. सह-प्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘स्टार प्रवाह’च्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १२) दादर येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे इव्हेंट पार्टनर ‘मी मंत्रा’ असणार आहेत. चला तर मग, श्रावणसरीत मनसोक्त भिजण्यासाठी सज्ज व्हा.
अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम, श्रावणाची गाणी, खेळ, मजा-मस्ती, गप्पा-टप्पा, मंगळागौरींचे खेळ, स्पर्धा आणि भरपूर बक्षिसे अशी मेजवानी खास तुमच्यासाठी असणार आहे.

अशा आहेत स्पर्धा
१ गार्निअर ब्लॅक नॅचरल्स हेल्दी हेअर कॉन्टेस्ट
२ ‘स्टार प्रवाह’ची सम्राज्ञी स्पर्धा
३ मराठमोळी फॅशन वॉक स्पर्धा
स्पर्धकांना मराठमोळा पारंपरिक साजशृंगार करून स्टेजवर येऊन रॅम्प वाॅक करावा लागेल.
४ उखाणा स्पर्धा
‘सकाळ श्रावण सरी’ हा शब्द किंवा यातील कोणताही एक-दोन शब्द उखाण्यात येणे आवश्यक आहे.
(नंबर ३ आणि ४ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या वेळी नावे नोंदवली जातील.)
५ ‘स्टार प्रवाह’च्या सेलिब्रिटींबरोबर गप्पा मारण्याची संधी
६. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे होणाऱ्या सामाजिक कार्यात सहभागाची संधी

१२ ऑगस्ट
दुपारी ३ वाजता
कुठे : छबिलदास हॉल, दादर रेल्वेस्थानकाजवळ, आयडियल बुक डेपोसमोर, दादर (पश्चिम)
गप्‍पा : ‘स्टार प्रवाह’चे सेलिब्रेटी व आजचे प्रमुख आकर्षण डॉ. कार्तिक, आयेशा आणि श्वेता (रंग माझा वेगळा) यांच्याशी खास गप्पा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92528 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..