सेन्सेक्समध्ये ५१५ अंशांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्समध्ये ५१५ अंशांची वाढ
सेन्सेक्समध्ये ५१५ अंशांची वाढ

सेन्सेक्समध्ये ५१५ अंशांची वाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः अमेरिकी चलनवाढ कमी होऊन त्याचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्यामुळे आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि भारतीय शेअर बाजारदेखील आज पाऊण टक्क्यांपेक्षाही जास्त वाढले. सेन्सेक्स ५१५.३१ अंश; तर निफ्टी १२४.२५ अंश वाढला.
११ एप्रिलनंतर निर्देशांक प्रथमच या टप्प्याला पोहोचले आहेत. सेन्सेक्स आता पुन्हा ६० हजारांच्या टप्प्याजवळ आला आहे. सध्याच्या तेजीमुळे जूनपासून सर्व गुंतवणूकदार ३९ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.
अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्याची आकडेवारी आल्यामुळे आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अमेरिकेतील चलनवाढ कमी झाल्यामुळे व्याजदरही कमी होतील, तसेच मंदीची छायाही कमी होईल अशा अपेक्षेने आज भारतातही चांगली खरेदी झाली. आज निफ्टीने १७,६५९ अंशांचा; तर सेन्सेक्सने ५९,३३२.६० अंशांचा टप्पा गाठला.
जून महिन्यातील बीएसईच्या भांडवली बाजारमूल्याच्या तुलनेत सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीमुळे सगळ्या गुंतवणूकदारांच्या सर्व शेअरचे एकूण भांडवली बाजारमूल्य ३९ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. २० जून रोजी बाजाराने तळ गाठला असताना बीएससीवरील सर्व शेअरचे एकूण भांडवली बाजार मूल्य २३५ लाख कोटी रुपये होते, ते आज २७४ लाख कोटी रुपये झाले. ऑगस्ट महिन्यातच बीएससीवरील सर्व शेअरचे एकूण भांडवली बाजारमूल्य साडेसात लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92532 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..