रक्षाबंधननिमित्त लोकल तुडुंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्षाबंधननिमित्त लोकल तुडुंब
रक्षाबंधननिमित्त लोकल तुडुंब

रक्षाबंधननिमित्त लोकल तुडुंब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : रक्षाबंधन असल्याने रेल्वेच्या तिन्ही उपनगरीय लोकल मार्गावर गुरुवारी दिवसभर हजारो प्रवाशांना तुडुंब गर्दीचा सामना करावा लागला. दादर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बोरिवली स्थानकात मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची गर्दी दिसून आली. त्यामुळे प्रवाशांना दिवसभर गर्दीतून प्रवास करावा लागला.

रक्षाबंधनाची सुट्टी नसल्याने कामावर जाणाऱ्यांबरोबरच रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या महिला प्रवाशांची गर्दी मोठी होती. कुटुंबकबिल्यासह भावाच्या किंवा बहिणीच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी निघाले होते. लोकलमध्ये गुरुवारी दिवसभर गर्दी वाढली होती. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर हेच चित्र दिसून आले आहे. त्यातही सकाळी मुंबई उपनगरात पावसामुळे लोकलच्या गतीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होत्या. परिणामी दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बोरिवली स्थानकात मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची गर्दी उसळली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92535 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..