अनुकंपा नोकर भरती रखडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुकंपा नोकर भरती रखडली
अनुकंपा नोकर भरती रखडली

अनुकंपा नोकर भरती रखडली

sakal_logo
By

पालघर, ता. ११ (बातमीदार) : राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३५ जिल्ह्यांत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबवली जाते; मात्र पालघर जिल्ह्यात सन २०११ पासून अनुकंपा भरती प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीच्या प्रक्रियेत वेळकाढूपणाचा फटका १८० लाभार्थ्यांना बसला आहे. काही उमेदवारांची वय उलटून गेली आहेत. वयाची ४५ वर्षे पार केलेल्या उमेदवारांना सूट द्यावी अथवा त्यांच्या इतर वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा यादीत समाविष्ट करण्याबाबत सरकारकडून मंजुरी घ्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया हा अनेक वर्षापासून गंभीर प्रश्नांची सोडवणूक करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा अधिकारासाठी जिल्ह्यातील १८० अर्जधारक २०११ पासून जिल्हा परिषद आणि मंत्रालयाच्या चकरा मारीत आहेत. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा अधिकारासाठी जिल्ह्यातील १८० अर्जधारक २०११ पासून जिल्हा परिषद आणि मंत्रालयात चकरा मारीत आहेत.

केवळ पालघर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया का होत नाही, असा थेट सवाल उमेदवारांकडून केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या बाजूला असलेल्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात मात्र अनुकंपा भरती प्रक्रिया राबवली जात असताना जिल्हा परिषदेकडूनच भरती प्रक्रियेला खो का घातला जातो, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. आज ना उद्या नोकरी लागेल, या भरवशावर घर, फ्लॅट, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले असताना वयाची ४५ गाठली असतानाही अजून नियुक्ती दिली जात नाही. शासन निर्णयाप्रमाणे वयाची ४५ वर्षे गाठल्यास अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास तो उमेदवार अपात्र ठरवला जातो.

२०१७ पासून प्रस्ताव प्रलंबित
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत अनुकंपा भरतीबाबतचा प्रस्ताव २०१७ पासून प्रलंबित आहे. त्यातच शासनाकडून सन २०१७ ते २०१८ मध्ये भरतीला प्रतिबंध व त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर वारसांनी केलेल्या अर्जावर प्रशासनाकडून सदर प्रस्तावाची पडताळणी, तसेच इतर कारणामुळे झालेली दिरंगाईमुळे पात्र असलेल्या उमेदवाराची शासनाकडून नियुक्ती झालेली नाही. संबंधित मयत झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वारसांनी विहित मुदतीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केलेला आहे. वयाची अट शिथिल करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी अथवा त्यांच्या इतर वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा यादी समाविष्ट करण्याबाबत शासनाकडून मंजुरी घेण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, अशी मागणी शिवा सांबरे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92544 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..