मोबाईल चोरांची टोळी उध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरांची टोळी उध्वस्त
मोबाईल चोरांची टोळी उध्वस्त

मोबाईल चोरांची टोळी उध्वस्त

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः चोरलेले मोबाईल परराज्यासह बांगलादेशात विकणारी टोळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष सहाच्या पथकाने मागील महिन्यात उद्ध्वस्त केली होती. त्या टोळीतील इतर सदस्यांना ताब्यात घेण्यासाठी धाडसत्र सुरूच ठेवले होते. या टोळीचा सदस्य जुनेद डोलिया याला शुक्रवारी अटक करत त्याच्याकडून १३५ चोरलेले मोबाईल फोन जप्त केले. आतापर्यंत एकूण १० आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
मुंबई व उपनगरात मोबाईल फोन चोरणारी टोळी सक्रिय होती. ही टोळी चोरलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलत होती. त्याला नवीन मोबाईलप्रमाणे पॅक करून परराज्यात तसेच बांग्लादेशात विकत होती. गुन्हे शाखेने महिनाभर या टोळीतील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत मागील महिन्यात मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये धाड टाकली होती. त्या वेळी ४९५ मोबाईल जप्त करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर पथकाने धाडसत्र सुरूच ठेवले होते. दादासाहेब भडकमकर मार्ग परिसरात गुरुवारी धाड टाकून या टोळीतील सदस्य असलेल्या जुनेदच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १३५ मोबाईल जप्त करत शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. तो हे मोबाईल बांग्लादेशमध्ये विक्रीसाठी पाठवत होता. एकूण दहा सदस्यांना मुंबई व उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत गुन्हे शाखेच्या पथकाने ही टोळी उध्वस्त केली आहे. या टोळीचे जेरबंद झाल्यामुळे मुंबई व उपनगरातील अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करणे शक्य होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92635 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..