कल्याणमधील तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद
कल्याणमधील तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद

कल्याणमधील तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्‍ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.

देशाच्या स्वातंत्र्याचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून, त्याचे औचित्य साधून केंद्र सरकारतर्फे घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या धर्तीवर कल्याणमध्‍ये शुक्रवारी केडीएमसी, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्थांतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. बिर्ला कॉलेजपासून या तिरंगा रॅलीची सुरुवात होऊन खडकपाडा सर्कल, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि महापालिका मुख्यालयावरून सुभाष मैदान येथे या रॅलीचा समारोप झाला.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर घर तिरंगा’ आदी घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने न्हाऊन गेला होता. या रॅलीमध्ये बिर्ला कॉलेजचे नरेशचंद्र, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परिमंडळ डीसीपी सचिन गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, केडीएमसीचे सचिव संजय जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

देशभक्तीपर गाण्यांनी मने जिंकली
विशेष म्हणजे आपल्या देशाचे वैशिष्ट्य असणाऱ्या विविधतेतील एकतेचे अत्यंत सुंदर असे दर्शन कल्याणमध्‍ये निघालेल्या या रॅलीमध्ये घडले. देशातील विविध समाजाचे नागरिक पारंपरिक वेशामध्ये या रॅलीत सहभागी झाले होते. त्यासोबतच महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या लेझीम, ढोल-ताशासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या बँड पथकाने वाजवलेल्या सुमधुर देशभक्तीपर गाण्यांनी सर्वांची मने जिंकली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92638 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..