जीवघेण्या कॅन्सरविरोधात जनजागृतीचा विडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवघेण्या कॅन्सरविरोधात जनजागृतीचा विडा
जीवघेण्या कॅन्सरविरोधात जनजागृतीचा विडा

जीवघेण्या कॅन्सरविरोधात जनजागृतीचा विडा

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १३ (वार्ताहर) ः अज्ञानामुळे होणाऱ्या कॅन्सरकडे दुर्लक्ष केल्याने महिलांमध्ये सर्वाधिक मृत्यू होण्याचे प्रमाण आहे. विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये या आजाराने बळी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा आजार होऊ नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबत पनवेल परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये कॅन्सरविषयक जनजागृतीचा विडा कामोठे येथील महिला मंचाने उचलला आहे.
बदललेली जीवनशैली, प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर कर्करोग होऊ नये, यासाठी नेमकी काय काळजी घ्यायची, याची जाण नसल्याने कित्येकांना हा आजार गाठतो. विशेष करून झोपडपट्टी परिसरातील महिला आरोग्याविषयी दक्ष नसतात. शिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बलता, अशिक्षितपणा आणि वैद्यकीय सुविधांचा अभावामुळे किशोरवयीन मुली; तसेच महिला कॅन्सरच्या बळी ठरतात. त्यामुळे या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा संकल्प दिशा महिला मंचने केला आहे. तज्ज्ञ महिला डॉक्टरांच्या माध्यमातून कॅन्सरबाबत माहिती देताना आजार होण्याअगोदरच खबरदारीबाबत महिलांना मार्गदर्शन केले जात आहे. तसेच आगामी काळात झोपडपट्टीमधील किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये या दुर्धर आजाराबाबत जनजागृती करण्याचा संकल्प दिशा महिला मंचच्या महिलांनी केला आहे. याकामी संस्थेच्या संस्थापिका नीलम आंधळे, विद्या मोहिते, खुशी सावर्डेकर यांच्यासह इतर सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.

कोट
आरोग्याविषयी जागृती नसल्याने विविध आजारांना निमंत्रण दिले जाते. विशेषतः महिलांमध्ये विविध प्रकारचा कॅन्सर हा आजार बळावला जातो. रोग झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा तो होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे कधीही वरदान ठरते. याच भावनेतून श्रावण सम्राज्ञी स्पर्धेतून कर्करोगाविषयी प्रबोधन आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहे.
- नीलम आंधळे, संस्थापिका, दिशा महिला मंच

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92652 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..