कबड्डीत राष्ट्रीय स्थरावर रायगडचा डंका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डीत राष्ट्रीय स्थरावर रायगडचा डंका
कबड्डीत राष्ट्रीय स्थरावर रायगडचा डंका

कबड्डीत राष्ट्रीय स्थरावर रायगडचा डंका

sakal_logo
By

खारघर ः जुलै महिन्यात हरियाणा येथे झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी संघाला उपविजेतेपद मिळाले होते. स्पर्धेतील या यशात पनवेल पालिकेच्या खारघर प्रभाग कार्यालय अंतर्गत असलेल्या धरणा कॅम्प गावातील कबड्डीपटू देवेंद्र कदम यांनी मोलाची कामगिरी बजावत रायगड जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यास भाग पाडले आहे.
सातारा येथील कोयना प्रकल्पामुळे स्थलांतर झालेल्या करंजावडे गाव हे तळोजा रोहिंजणलगत धरणा कॅम्प गाव विस्थापित झाले. गावात कबड्डीला फार महत्त्व असून विविध खेळाडू या गावातून चमकले आहेत. यात आणखी एक नाव सध्या चर्चेत आहे. लहानपणापासून कबड्डी खेळाची आवड असणाऱ्या देवेंद्र कदम यांनी शाळा, महाविद्यालयात असताना मैदान गाजविले आहेत. रायगड जिल्ह्यातील जयभवानी नवतरुण मंडळ संघाकडून खेळताना मुंबई उपनगरात उत्कृष्ट पकड, तसेच चढाईपटू म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी महाराष्ट्र पोलिसमध्ये भरती झाल्यानंतर कबड्डीपटू म्हणून ओळख असलेला देवेंद्र १५ वर्षांपासून महाराष्ट्र पोलिस संघात खेळत आहे. सध्या महाराष्ट्र पोलिस संघाचा कर्णधार म्हणून धुरा सांभाळताना संघाला ऑल इंडिया स्पर्धेमध्ये कास्य, रौप्य आणि सुवर्णपदक मिळवून देण्यात कदम यांचा मोठा वाटा आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात काल्हेर-भिवंडी येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत धुळे संघाकडून खेळताना संघाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील संघात देवेंद्र यांची वर्णी लागली आहे.
---------------------------------------
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये रौप्यपदक
जुलै महिन्यात हरयाणा येथे झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदक मिळाले होते. स्पर्धेतील या यशात देवेंद्रचे योगदान मोठे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कबड्डीला मानाचे स्थान मिळवून देण्यात यश आले आहे.
----------------------------
महाराष्ट्र संघाकडून खेळत असतो. तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर राज्य येते. त्यामुळे सर्व खेळाडू कौशल्य पणाला लावून राज्याचे नाव व्हावे, यासाठी खेळत असतात.
- देवेंद्र कदम, कबड्डीपटू

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92657 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..