राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : अतिवृष्टी व ढगफुटीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे वाहून गेली आहेत. कृषी व महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसानीसंदर्भात करून तात्काळ सरकारकडे अहवाल सादर करावा. राज्य सरकारने ओल्या दुष्काळाची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी वसई येथे केली.

महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली होती; मात्र आता संततधार पावसाने भातशेतीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी. बोगस खते, बी, बियाणे, औषधांमुळे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची २५ टक्के पिके उगवली नाहीत. त्यामुळे दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पराग पष्टे यांनी शासनाकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92681 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..