ठाणे पालिकेच्या हजेरी शेडवर राखीपौर्णिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या हजेरी शेडवर राखीपौर्णिमा
ठाणे पालिकेच्या हजेरी शेडवर राखीपौर्णिमा

ठाणे पालिकेच्या हजेरी शेडवर राखीपौर्णिमा

sakal_logo
By

ठाणे, ता. १३ : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र मोठ्या उत्साहाचे वातावरण पसरलेले असते. अशातच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर अशा कर्मचाऱ्यांमध्येदेखील स्नेहाचे बंध अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने ठाणे पालिकेने प्रथमच महापालिकेच्या विविध हजेरी शेडवर रक्षाबंधन हा उत्सव साजरा करण्यात आला. प्रथमच साजरा करण्यात आलेल्या सणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते.

ठाणे पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच महापालिकेच्या हजेरी शेडवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुष कर्मचारी, महापालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. महापालिकेच्या एकूण ५० हजेरी शेड असून या ठिकाणी महापालिकेचे १,९०० कर्मचारी असून त्यापैकी १,१४० पुरुष व ७६० महिलांचा समावेश आहे; तर एकूण २,०३६ कंत्राटी कामगार असून त्यापैकी १,२२२ पुरुष व ८१४ महिला काम करीत आहे. महापालिकेच्या सर्व हजेरी शेडवर महिला कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या उपक्रमाचे ठाणे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92695 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..