भाविकांची गर्दी असणारे कामणचे हनुमान मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाविकांची गर्दी असणारे कामणचे हनुमान मंदिर
भाविकांची गर्दी असणारे कामणचे हनुमान मंदिर

भाविकांची गर्दी असणारे कामणचे हनुमान मंदिर

sakal_logo
By

वसई पूर्वेकडील कामण गावात हनुमान मंदिर असून हे मंदिर १०० वर्षांहून अधिक पुरातन आहे. या मंदिरात आजूबाजूच्या गावातील भक्तगणांचा मारुतीचे दर्शन घेण्यासाठी ओघ असतो. स्वच्छ नीटनेटका परिसर आकर्षित करतो. येथील मंदिरात वर्षभर अनेक सण उत्सव साजरे केले जातात.

कामण गावाच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिरात श्रावणात कथावाचन होते. यंदा आळंदी येथील भागवताचार्य गोविंद महाराज यांनी भागवत कथा वाचन केले. कामणसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने भागवत कथा श्रवणाकरिता हनुमान मंदिरात हजेरी लावली होती. या वेळी कीर्तनाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी हनुमान जयंतीला यात्रोत्सव असतो; तर वर्षभरात गणेशोत्सव, हनुमान जयंती, नवरात्रोत्सव, गोपाळकाला अशा विविध सणांत भाविक आनंद घेत असतात. मारुतीच्या या मंदिरात हनुमान चालिसा पठण, गणपती अथर्वशीर्ष, श्लोक पठण करण्यासाठीदेखील भाविक येत असतात. पुरातन मंदिर असल्याने भाविकांची श्रद्धा गाढ आहे. त्यामुळे अत्यंत भक्तिरसात नागरिक न्हाऊन निघत असतात.

भजन कीर्तनातून सामाजिक प्रबोधन व अध्यात्माची जोड जीवनात प्रेरणा व नवी ऊर्जा देणारी ठरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कामण गावातील नागरिक अखंडपणे मारुतीची भक्ती, सेवा करत आहेत. या मंदिराने नागरिकांना संघटित ठेवले आहे. गोपाळकृष्ण, गणपती व हनुमान अशा देवांच्या मूर्ती आहेत. शांत परिसर असून कामणसह पोमण, मोरी, चिंचोटी, पायगाव, जुचंद्र, कर्णाळा, वालीव, ससुनवघर, आचोळे, बापाणे, चंद्रपाडा ते आजूबाजूच्या गावपाड्यांतील नागरिकांची गर्दी नेहमीच पाहावयास मिळते.

नीती धर्म जागृत मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. वर्षभर या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत असते. दूरहून भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी येत असतात, अशी माहिती येथील ग्रामस्थ प्रकाश म्हात्रे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92696 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..