रक्षाबंधनानिमित्त कल्याण एसटी डेपोला लाखोंचे उत्‍पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्षाबंधनानिमित्त कल्याण एसटी डेपोला लाखोंचे उत्‍पन्न
रक्षाबंधनानिमित्त कल्याण एसटी डेपोला लाखोंचे उत्‍पन्न

रक्षाबंधनानिमित्त कल्याण एसटी डेपोला लाखोंचे उत्‍पन्न

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : ‘रक्षाबंधन’ सणानिमित्त कल्याण एसटी डेपोमधून राज्यातील विविध शहरांत विशेष बस सोडल्या होत्या. दोन दिवसांत ४८ हजार किलोमीटर मार्गावर बस धावल्या असून डेपोला सुमारे २५ लाखांचे उत्‍पन्न प्राप्त झाले आहे.

रक्षाबंधन हा भावा-बहिणींच्या पवित्र नात्याचा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने, विश्वासाने व पावित्र्याने साजरा केला जातो. त्या निमित्ताने भावा-बहिणींकडे, नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्या-येण्याच्या निमित्ताने कल्याण एसटी डेपोमध्ये प्रचंड प्रमाणात प्रवासी गर्दी होत असते. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार सकाळपासून कल्याण एसटी डेपोमधून जादा बस सोडून बहिणींना रक्षाबंधनाची अनोखी भेट दिली होती.

कल्याण एसटी डेपोच्या ताफ्‍यात ७० बस असून कल्याण-भिवंडी, कल्याण-पनवेल, कल्याण- आळेफाटा, कल्याण-अहमदनगर, कल्याण-पडघा, कल्याण-पुणे आदी मार्गांवर जास्तीत जास्त एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. त्याला प्रवासी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.

रक्षाबंधनाच्या दिवशी २५ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक करण्याचे उद्दिष्ट असून, १६ लाखांच्‍यावर उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा डेपो व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी व्यक्त केली होती. मात्र, दोन दिवसांत रेकॉर्ड ब्रेक उत्‍पन्न प्राप्त झाले आहे. जवळपास ४८ हजार किलोमीटर एसटी बस धावल्या असून, सुमारे २५ लाखांचे उत्‍पन्न डेपोला प्राप्त झाले आहे. सध्या कल्‍याण एसटी डेपोला प्रतिदिन सुमारे आठ लाख रुपये तिकीट विक्रीमधून उत्‍पन्न प्राप्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92709 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..