अमृत महोत्सवी वर्षं साजरे करण्यासाठी बच्चे कंपनीत जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत महोत्सवी वर्षं साजरे करण्यासाठी बच्चे कंपनीत जल्लोष
अमृत महोत्सवी वर्षं साजरे करण्यासाठी बच्चे कंपनीत जल्लोष

अमृत महोत्सवी वर्षं साजरे करण्यासाठी बच्चे कंपनीत जल्लोष

sakal_logo
By

भगवान खैरनार, सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. १३ : स्वातंत्र्याचे  ७५  वर्षे अमृत महोत्सवी वर्षं म्हणून देशात साजरे केले जात आहे. त्यादृष्टीने पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हा महोत्सव साजरा करण्यासाठी  ३०  जुलै ते  १७  ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे अधिकच रंगत आली आहे. बच्चे कंपनीला अनोखे ऊपक्रम करावे लागत असल्याने बच्चे कंपनी खुष असून ते हा ऊपक्रम जल्लोषात साजरा करत आहेत. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यतच्या शाळेत अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोष आहे.
अमृत महोत्सवी वर्षं प्रत्येक खेड्यापाड्यातील घराघरात जल्लोषाने साजरे करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या शाळा महत्त्वाची भुमिका बजावत आहे. स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील शाळांना कार्यक्रम आखून दिला आहे. त्याची सुरुवात  ३०  जुलैला ‘हर घर तिरंगा’ जनजागृती करण्यासाठी गावात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून करण्यात आली. १  ऑगस्टला स्वराज्य महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बच्चे कंपनी ने मनमुराद आनंद लुटला आहे. २ ते ६  ऑगस्ट दरम्यान शाळा तसेच महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 
स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांच्या प्रदर्शनाचाही ऊपक्रम राबविण्यात आला आहे. शाळा स्तरावर वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले गेले. त्यानंतर शाळांची तसेच कार्यालयाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. तर  १५  ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात हिरीरीने सहभाग घेत आतापर्यंत सर्व कार्यक्रम यशस्वी केले आहेत.


फोटो......

पालघर आणि मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम सावर्डे गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमात जल्लोषात सहभाग नोंदवला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92721 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..