स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किल्ल्यांची सैर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किल्ल्यांची सैर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किल्ल्यांची सैर

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त किल्ल्यांची सैर

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून मिरा भाईंदर महापालिका शहरातील नागरिकांना घोडबंदर किल्ला व जंजीरे धारावी किल्ला या ऐतिहासिक ठेव्यांची मोफत सैर घडवणार आहे. यासाठी १५ ऑगस्टला भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट चौकातून विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
घोडबंदर येथील किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आहे. तर चौक येथील जंजीरे धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. या दोन्ही किल्ल्यांचे जतन व त्यांच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. घोडबंदर किल्ल्याचे लयाला गेलेले वैभव परत मिळवून त्याला नवी झळाळी देण्याचे काम आता अंतीम टप्प्यात आहे तर जंजीरे धारावी किल्ल्याची महापालिकेकडून दररोज स्वच्छता करण्याचे सुरु असून त्याच्या सुशोभीकरणाच्या आराखड्याला लवकरच मंजूरी मिळणार आहे. या दोन्ही किल्ल्यांना भेट देण्याची संधी नागरिकांना उपलब्ध झाली आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही ऐतिहासिक वारसा स्थळांचे दर्शन शहरातील नागरिकांना व्हावे यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या सूचनेनुसार १५ ऑगस्टला महापालिकेने विशेष बस सेवा उपलब्ध केली आहे. भाईंदर पूर्व गोल्डन नेस्ट येथून जंजीरे धारावी व घोडबंदर किल्ल्यासाठी पहिली बस सकाळी १०.३० सोडण्यात येईल. घोडबंदर किल्ल्याला जाणारी बस काशी मिरा मार्गे जाईल, किल्ला पाहून झाला की तीच बस पुढे जंजीरे धारावी साठी जाईल. जंजीरे धारावीला जाणारी बस मॅक्सस मॉलवरुन जाईल व जंजीरे धारावी किल्ला बघून झाल्यानंतर ती घोडबंदर किल्ल्याला जाईल. दोन्ही बसचा शेवट पुन्हा गोल्डन नेस्ट चौकात होणार आहे. या दोन्ही किल्ल्यांसाठी दूसरी बस दुपारी २.३० सुटणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेऊन नागरिकांनी दोन्ही किल्ल्यांना भेटी द्याव्यात असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92724 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..