खड्ड्यांमुळे एकमेकांना धडकून वाहनांचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांमुळे एकमेकांना धडकून वाहनांचा अपघात
खड्ड्यांमुळे एकमेकांना धडकून वाहनांचा अपघात

खड्ड्यांमुळे एकमेकांना धडकून वाहनांचा अपघात

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विवळवेढे (महालक्ष्मी) येथे उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे चार वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनदेखील खड्डे बुजवले जात नसल्यामुळे महालक्ष्मी ग्रामस्थांनी आक्रमक होत महामार्ग प्रशासनाला धारेवर धरले.
शनिवार १३ ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील उड्डाणपुलावर खड्डे वाचवण्याचा प्रयत्नात असलेल्या चारचाकी वाहनांचा एकामागोमाग धडक बसून अपघात झाला. सर्वांत आधी टोयोटा त्याच्या मागे दोन अर्टिका व त्यामागे मारुती सेलेरिओ अशा एकूण चार वाहनांचा अपघात झाला होता. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन वाहने घटनास्थळावरून पसार झाली, परंतु मागील अर्टिका व सेलेरिओ कारमधील कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. दोन्ही कारमध्ये लहान मुले, वृद्ध व महिला यांचा समावेश होता, या वेळी महालक्ष्मी गावातील तरुणांनी त्यांना इच्छित स्थळी पोचवण्यासाठी मदत केली. त्यापाठोपाठ त्याच ठिकाणी पुन्हा दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाला होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे प्रवाशां‍ना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

तकलादू पद्धतीने केली खड्डेभरणी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्डेमय रस्त्यावरून आमदार राजेश पाटील, विनोद निकोले, श्रीनिवास वनगा यांनी संबंधित यंत्रणांना पत्र देऊन रस्ते दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्या वेळी तात्पुरते खड्डे बुजवण्यात येऊन दिलासा देण्यात आला होता; मात्र काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. महामार्गावरून रोज हजारो वाहने भरधाव वेगात प्रवास करत असतात अशात तकलादू पद्धतीने केलेली खड्डेभरणी किती दिवस टिकणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे; तर खड्डेभरणी करताना तकलादू पद्धतीचा वापर न करता योग्य ती पद्धत वापरून रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92725 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..