एटीएममध्ये गंडा घालणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएममध्ये गंडा घालणाऱ्याला अटक
एटीएममध्ये गंडा घालणाऱ्याला अटक

एटीएममध्ये गंडा घालणाऱ्याला अटक

sakal_logo
By

वसई, ता. १३ (बातमीदार) : हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून खात्यातील रक्कम काढणाऱ्या दोघांपैकी एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने ६ गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५० एटीएम कार्ड जप्त केली आहेत.
तक्रारदार व्यावसायिक दीपक साईल हे नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले होते. तेव्हा आरोपीने नेटवर्क बरोबर नाही, असे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवले व एटीएमची अदलाबदली करून १० हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. याची तक्रार येताच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. यात गुन्ह्यात दोन संशयित असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यापैकी एक संतोष भुवन येथे राहणाऱ्या प्रदुन्य यादव (२२) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासात आरोपीने तुळींज परिसरात ३, आचोळे २ व पेल्हार येथे एक असे एकूण सहा गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. पोलिस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या मार्गदशनाखाली तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक रामचंद्र शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92729 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..