पर्यावरण पूरक साहित्यातून दिव्यांगानी साकारला तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण पूरक साहित्यातून दिव्यांगानी साकारला तिरंगा
पर्यावरण पूरक साहित्यातून दिव्यांगानी साकारला तिरंगा

पर्यावरण पूरक साहित्यातून दिव्यांगानी साकारला तिरंगा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. दादर येथील जी उत्तर विभाग पलिकेतर्फे अमृतमहोत्सवानिमित्त तीन दिवस विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीतून दादर येथील वनिता समाज सभागृहात दिव्यांगांनी पर्यावरण पूरक साहित्यातून भारताचा तिरंगा साकारला. तीन रंगी गोंडा फुलांचा वापर करत हा तिरंगा साकारण्यात आला. यात ४० किलो भगवा गोंडा, ४० किलो सफेद गोंडा व २० किलो हिरवा गोंडा वापरण्यात आला. ४० दिव्यांग मुलांनी पर्यावरणस्नेही साहित्य वापरून ७५ फुटांचा तिरंगा साकारला. तसेच तीन दिवस साजरा होणाऱ्या उपक्रमात १४ ऑगस्ट रोजी दिव्याग मुलांकडून मल्लखांब प्रात्यक्षिकांचे सादरीकरण, शारीरिक व मानसिकदृष्ट्या विशेष सक्षम असणाऱ्या कलाकारांचा गायन व नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे जी उत्तर विभागाचे घन कचरा व्यवस्थापनचे सहायक अभियंता इरफान काझी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92751 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..