‘बेस्ट’मध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बेस्ट’मध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ
‘बेस्ट’मध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

‘बेस्ट’मध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : शाळेतून घरी परतताना बेस्ट बसमध्ये एका शाळकरी मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. ही घटना जून महिन्यात घडली होती. गेल्या आठवड्यात मुलीला तिच्या बसमध्ये आरोपी पुन्हा दिसला, तेव्हा हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यानुसार मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गिरगाव परिसरात राहणारी पीडित मुलगी जे. मेहता बेस्ट बस थांब्यावरून १२१ क्रमांकाच्या बसमधून दुपारच्या सुमारास घरी जात होती. बस ग्रँट रोड येथील नाना चौकाजवळील पुलावर पोहोचत असतानाच आरोपीने तिला स्पर्श केला; मात्र तिने काही करण्यापूर्वीच आरोपीने तेथून पळ काढला. घरी पोहोचल्यानंतर पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला; मात्र त्यांनी पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या आठवड्यात तिला तिच्या बसमध्ये तोच आरोपी दिसला. हा प्रकार तिने कुटुंबीयांना सांगताच याचे गांभीर्य लक्षात घेऊन कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार मलबार हिल पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम ३५४- ए, ३५४-डी, तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अल्पवयीन मुलीच्या मित्राने आरोपीचा व्हिडीओही बनवला होता, ज्याच्या मदतीने पोलिस आता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92753 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..