जातप्रमाण पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीनचीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातप्रमाण पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीनचीट
जातप्रमाण पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीनचीट

जातप्रमाण पडताळणी समितीकडून समीर वानखेडेंना क्लीनचीट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले होते. वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावाही केला होता. या प्रकरणात आता वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.
वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्माचा स्वीकार केल्याची सिद्ध होत नाही, असे समितीने म्हटले आहे. समीर वानखेडे हिंदू महार ३७ अनुसूचित जातीचे सिद्ध होत असल्याचे समितीने म्हटले आहे. तसेच समीर वानखेडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ही तक्रार फेटाळली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92760 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..