पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालघरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

sakal_logo
By

पालघर, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने पालघर जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हा अधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पालघर येथे सोमवारी सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या दिवशी शासकीय समारंभासाठी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92763 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..