सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची बाईक रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची बाईक रॅली
सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची बाईक रॅली

सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची बाईक रॅली

sakal_logo
By

सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांची बाईक रॅली

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवी मुंबईतील सीआयएसएफ पश्चिम विभागीय कार्यालय आणि एसबीआय तुर्भे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा या मोहिमेसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सीआयएसएफच्या डीआयजी नीलिमा राणी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही बाईक रॅली केंद्रीय सदन ते बेलापूर रेल्वे स्थानकदरम्यान काढण्यात आली. या वेळी एआयजी धीरज कुमार, नवी मुंबईचे प्रादेशिक व्यवस्थापक कपिल गर्ग यांच्यासह ३० सीआयएसएफ जवानांसह एसबीआयचे अधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या वेळी बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकामध्ये एक हजार राष्ट्रध्वजांचे लोकांमध्ये वाटप करण्यात आले. तसेच शासकीय उपक्रम आणि ध्वजसंहितेचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात आली.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पश्चिम सेक्टर मुख्यालय व लायन्स इंटरनॅशनल क्लब यांच्या संयुक्त विद्यमानेदेखील शनिवारी केंद्रीय राखीव पोलिस दल जवानांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सीबीडी बेलापूर येथील एकता विहार येथे लायन्स इंटरनॅशनल क्बल आणि केंद्रीय राखीव पोलिस दल सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92764 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..