आमदारांने बंद पाडली टोल वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांने बंद पाडली टोल वसुली
आमदारांने बंद पाडली टोल वसुली

आमदारांने बंद पाडली टोल वसुली

sakal_logo
By

पालघर, ता. १३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर ते तलासरीपर्यंतचे खड्डे बुजवण्यास महामार्ग प्राधिकरण असमर्थ ठरले असून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी शनिवारी दुपारी खानिवडे टोलनाक्यावर आंदोलन करत टोलनाका बंद पाडला आहे. पुढील दोन दिवसांत महामार्गावरील खड्डे जर बुजवण्यात आले नाहीत, तर पूर्ण महामार्ग बंद करू, असा इशारा आमदार राजेश पाटील यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिला.

तलासरी ते घोडबंदरदरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील दोन महिन्यांपासून निवेदने देऊन, आंदोलने करूनही खड्डे जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे वाहनचालक व या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशां‍ना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कंपनीने खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक व डांबरमिश्रित खडी टाकण्याचे काम सुरू केले; मात्र ते काम इतके तकलादू ठरले आहे, की एकाच दिवसात तेथे पहिल्यापेक्षा मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या महामार्गाची स्थिती आता बिकट झाली असून खड्ड्यांमुळे रोजच्या रोज अपघात घडत आहेत. त्यामुळे एक तर खड्डेमुक्त महामार्ग करा; अन्यथा टोलवसुली बंद करा अशा घोषणा देत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली टोलवसुली बंद पाडली. या वेळी पंचायत समितीचे सदस्य अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्याणी तरे, माजी उपसभापती कविता किरकिरा यांच्यासह बविआचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोट
---
मुंबई-आमदाबाद महामार्ग क्रमांक ४८ वर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदार नेमला आहे. त्या ठेकेदाराकडे या कामासाठी लागणारी साधनसामुग्री नाही. दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी नाही. तुमच्याकडे जर काहीच मिळत नाही, तर तुम्ही टोल कसा काय वसूल करता, तुम्ही प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहात. दोन दिवसांत महामार्गावरील खड्डे भरले नाहीत, तर पूर्ण महामार्ग बंद करू.
- राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92770 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..