एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद मृत्यू
एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद मृत्यू

एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद मृत्यू

sakal_logo
By

चिरा, ता. १३ (बातमीदार) : विरारमधील एकाच कुटुंबातील दोघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय मांडवी पोलिसांनी वर्तविला असून याच कुटुंबातील आणखीन तिघांचीही स्थिती चिंताजनक आहे. या प्रकरणी मांडवी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भोयेपाडा येथे अश्फाक खान आणि राजिया खान हे आपल्या पाच अल्पवयीन मुलांसह राहतात. यातील मुलगा आसिफ खान (९) आणि मुलगी फरीफ खान (८) या दोघांना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोटात दुखून उलट्या होऊ लागल्याने तात्काळ भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते; तर त्यानंतर फराना खान (१०), आरिफ खान (४) आणि साहिल खान (३) या तिघांनाही पोटात दुखत असल्याने तुळींज रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील आसिफ आणि आरिफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे; तर इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जेवल्यानंतर हे सर्व कुटुंब झोपले होते. मात्र पहाटेच्या वेळी अचानक या मुलांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितले. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तविला असून या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत चित्र स्पष्ट झाले नसल्याने मांडवी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92785 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..