स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर म्हसरोली गावात बस धावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर म्हसरोली गावात बस धावली
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर म्हसरोली गावात बस धावली

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर म्हसरोली गावात बस धावली

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना तालुक्यातील म्हसरोली या गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारपासून धाऊ लागली आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत व महसूल गाव म्हणून नोंद असलेल्या म्हसरोली गावची लोकसंख्या १८४० इतकी असून हे गाव अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. या गावात आजपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आलेली नव्हती. वाडा येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नव्हती. अखेर गेल्या आठवड्यात येथील शिवसेनेचे कार्यकर्ते नीलेश गंधे, तुषार यादव, भाऊ भानुशाली यांनी वाडा आगार व्यवस्थापक यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला, तेव्हा या परिसरासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली. वाडा ते कंचाड, विक्रमगड तालुक्यातील ब्राह्मण गाव, वडपोली, कडी, म्हसरोली या मार्गावर ही बस धावणार आहे. या परिसरातील सावरोली, आंबिवली, सुपोंडे, कुमदळ, धोडीपाडा या गावांतील नागरिक, विद्यार्थी यांना या बससेवेचा फायदा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92788 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..