अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात
अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात

sakal_logo
By

भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : ठाणे व पालघर जिल्हा परिषदेसह इतर शासकीय आणि खासगी शाळांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त अतिरिक्त कामाच्या तणावामुळे शिक्षकांचे जीवन धोक्यात आले आहे. गेल्या महिन्याभरात ठाणे व पालघर जिल्हा परिषद शाळेतील तीन शिक्षकांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने शिक्षकांच्या कामांचे सुनियोजन करण्याची मागणी शिक्षण क्रांती संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील अनेक शिक्षक व शिक्षिका समर्पित भावनेने शैक्षणिक सेवा बजावत आहेत. सध्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने दारोदार फिरून विद्यार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. त्याचबरोबर अध्यापनाचे काम, वेळोवेळी आलेली अशैक्षणिक कामेही त्यांना पूर्ण करावी लागत आहेत. त्याचबरोबर सरकारकडून अथवा स्थानिक प्रशासनाकडून ऐनवेळी महत्त्वाची माहिती मागवली जाते. ही माहिती तात्काळ सादर करण्यासाठी शिक्षकांवर प्रचंड दबाव असतो. या मानसिक दबावामुळे शिक्षक व शिक्षिकांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आदी दुर्धर आजार जडले आहेत. या घटना गंभीर असून भविष्यात शिक्षकांच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेसह सरकारी व खासगी शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे सुनियोजन करून ठोस कारवाई करावी, असे विनंतीवजा पत्र शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92802 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..