तिरंगा दिंडीमध्ये शेकडो नागरिक सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरंगा दिंडीमध्ये शेकडो नागरिक सहभागी
तिरंगा दिंडीमध्ये शेकडो नागरिक सहभागी

तिरंगा दिंडीमध्ये शेकडो नागरिक सहभागी

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पक्ष कल्याण, विकास फाऊडेशन व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य पायी तिरंगा दिंडीत शेकडो नागरिक, व्यापारी, अनेक शाळांमधील शिक्षक व शहरातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

शनिवारी सकाळी कल्याणमधील दुर्गाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तिरंगा दिंडीला सुरुवात झाली. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीला सुरुवात केली. या वेळी भारतीय जनता पक्षाचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण विकास फाऊडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार, भाजपा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्कप्रमुख राजाभाऊ पातकर, माजी नगरसेवक दया गायकवाड, अर्जुन भोईर, वैशाली पाटील, उपाध्यक्ष जनार्दन कारभारी, संजय कारभारी, भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योतीताई भोईर, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा, युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ गोईकणे, भटके विमुक्त आघाडी कल्याण अध्यक्ष विष्णू सांगळे, संदीप सिंग, विवेक वाणी, मंगल वाघ यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92803 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..