अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्याअध्यक्षपदी पाटील यांची फेरनिवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्याअध्यक्षपदी पाटील यांची फेरनिवड
अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्याअध्यक्षपदी पाटील यांची फेरनिवड

अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्याअध्यक्षपदी पाटील यांची फेरनिवड

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १४ (बातमीदार) : अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी सदाशिव पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ तिवरे आणि जिल्हाध्यक्ष सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या हस्ते सदाशिव पाटील यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलने, मोर्चे, शिबिरे घेतलेली असून, कोरोना काळात असंख्य नागरिकांना मोफत लसीकरणदेखील करून दिलेले आहे. राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष पूनम शेलार, सरचिटणीस धनंजय सुर्वे, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार, भालचंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92812 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..