उल्हासनगरात तिरंगा रॅलीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात तिरंगा रॅलीचे आयोजन
उल्हासनगरात तिरंगा रॅलीचे आयोजन

उल्हासनगरात तिरंगा रॅलीचे आयोजन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने उल्हासनगर पालिका अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वतीने तिरंगा रॅलीत काढण्यात आली.
महापालिकेच्या मागील अग्निशमन दलाच्या कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीला आयुक्त अजीज शेख आणि आमदार कुमार आयलानी यांनी हिरवा झेंडा दाखविला. कॅम्प नंबर ३ परिसरातून खेमानी मार्गे फारवर्ड लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, १७ सेक्शन चौक येथून महापालिका येथे या रॅलीची सांगता झाली. रॅलीत आयुक्त अजीज शेख, आमदार कुमार आयलानी, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, शहर अभियंता प्रशांत सोळंके, मुख्य लेखा परीक्षक शरद देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे, पालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके, अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस, सुरक्षा रक्षक, वाहतूक पोलिस सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92818 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..