शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा
शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा

शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा

sakal_logo
By

खारघर, ता.१४ (बातमीदार) : विकसित देश बनायचे असेल तर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत कृषिभूषण पुरस्कार विजेते कांतराम काका देशमुख झरीकर यांनी खारघर येथे व्यक्त केले. सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. सुरोशे, खारघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर येथील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात कृषिभूषण पुरस्कार विजेते कांतराम काका देशमुख झरीकर यांनी प्राचीन व आधुनिक काळातील शेतीविषयी मार्गदर्शन केले. तसेच विकसित देश बनवायचे असेल तर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच देशातून जातीय व्यवस्था नष्ट करायची असेल तर ‘एक गाव एक स्मशानभूमी’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध शस्त्रास्त्रांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92821 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..