लोक अदालतीमध्ये २९ लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोक अदालतीमध्ये २९ लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल
लोक अदालतीमध्ये २९ लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल

लोक अदालतीमध्ये २९ लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : कल्याणच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक विभागाने ४३०० चलनाचे एकूण २९ लाख रुपये एवढी तडजोड रक्कम वसूल केली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात तीन वाहतूक पोलिस ठाणी असून राष्ट्रीय लोक अदालत माध्यमातून कल्याण वाहतूक विभागाच्या पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्‍वये ज्‍या वाहनचालकांनी व मालकांनी प्रलंबित ई-चलानची रक्‍कम भरली नाही, अशा वाहनचालकांना, मालकांना तालुका विधी सेवा समिती, लोक अदालतीमार्फत १८ जुलैपासून नोटिसा पाठवल्या होत्या. त्‍या अनुषंगाने शहर वाहतूक उपशाखा कल्‍याण यांच्याकडून १८ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंतच्या एकूण १४३४ ई-चलनाचे तडजोड शुल्‍क ८ लाख ४७ हजार १०० रुपये रक्‍कम वसूल करण्‍यात आल्याचे माहिती कल्याण पश्चिम वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

डोंबिवली वाहतूक पोलिसांनी १८ जुलैपासून १४५२ ई- चलनाचे तडजोड शुल्क ७ लाख ३३ हजार ९५० रुपये दंड वसूल केले असल्याची माहिती डोंबिबली वाहतूक विभाग पोलिस निरीक्षक उमेश गीते यांनी दिली; तर कल्याण पूर्व वाहतूक विभागाने १३ ऑगस्टपर्यंत ७ लाख २४ हजार ५५० रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती कल्याण पूर्व वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92823 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..