बनावट कागद पत्र्यांच्या आधारे शेतजमिनीची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट कागद पत्र्यांच्या आधारे शेतजमिनीची विक्री
बनावट कागद पत्र्यांच्या आधारे शेतजमिनीची विक्री

बनावट कागद पत्र्यांच्या आधारे शेतजमिनीची विक्री

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : सफाळे पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सोनावे गावातील ११५ गुंठे शेतजमीन बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डांच्या आधारे विक्री केल्याची घटना समोर आली आहे. तोतया इसमाला जमीनमालक म्हणून उभा करून उपनिबंधक कार्यालयाची फसवणूक करत खरेदीखत नोंद करून विक्री केल्याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारगाव तलाठी सजाअंतर्गत सोनावे गावच्या गट क्रमांक १४५/२/१ या जमिनीच्या अभिलेखात फेरफार नोंद करण्यासाठी आलेल्या सुधीर वामन केतकर नावाची व्यक्तीचा तलाठ्यांना संशय आल्याने त्यांनी घेतलेल्या उलटतपासणीत सुधीर केतकर यांना त्यांचे मुळ गाव आणि विक्री केलेल्या जमिनीचे स्थान माहीत नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर राहुल सोनार या व्यक्तीने तलाठी कार्यालयात येऊन खरेदीखताचा फेरफार नोंदवण्याची विनंती करीत करीत तलाठी किरण जोगदंड यांना आर्थिक प्रलोभन दिले. या वेळी राहुल सोनार सोबत जमीनमालक सुधीर वामन केतकर आले नसल्याने तलाठी किरण जोगदंड यांचा संशय बळावल्याने त्यांनी पालघरच्या तहसीलदारांना याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती केली होती.

तहसीलदारांकडून सफाळे पोलिस स्टेशनला चौकशीचे पत्र दिल्यानंतर तपासात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सुधीर वामन केतकर यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड बाळगणारा तोतया इसम, साक्षीदार कविता लाड, राहुल सोनार आणि अनंत पाटील यांनी बनावट आधार कार्ड व पॅनकार्ड तयार करून जमीनविक्रीच्या खरेदीखताची नोंद करून उपनिबंधक कार्यालयाची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी किरण जोगदंड यांच्या फिर्यादी वरून सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

एकाच क्रमांकाची दोन आधार कार्ड
--------------------------
खरेदीखताची नोंदणी करताना संशयित जमीनमालक म्हणून उभे केलेले सुधीर वामन केतकर आणि साक्षीदार कविता अशोक लाड यांचा आधार क्रमांक एकच असल्याने दोघांची आधार कार्ड बनावट असल्याचे समोर आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92826 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..