मुलुंडमध्ये रक्षाबंधन जल्लोषात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये रक्षाबंधन जल्लोषात साजरा
मुलुंडमध्ये रक्षाबंधन जल्लोषात साजरा

मुलुंडमध्ये रक्षाबंधन जल्लोषात साजरा

sakal_logo
By

मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः विठाई प्रतिष्ठानतर्फे याही वर्षी मुलुंड सीमेवरील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक, उपअधीक्षक त्याचबरोबर कर्मचारी उपस्थित होते. विठाई प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, खजिनदार विक्रांत महाडिक, तुषार सावंत, रत्नदीप पाटील आदी उपस्थित होते. आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थीसुद्धा यात सहभागी झाले होते. त्‍याचबरोबर अनेक महिलांनी मुलुंड पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिसांच्या हातावर राख्या बांधल्या. शाळेत जाणाऱ्या मुलींनीही पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिसांच्या हातावर राख्या बांधल्या. त्याचप्रमाणे भाजप महिला आघाडीप्रमुख दीपिका संदेश घाग आणि कार्यकर्त्यांनीही पोलिस बांधवांना राख्या बांधल्या. पोलिसांनी या सर्व महिलांचे आभार मानले आणि महिलांना संरक्षण देण्यासाठी सदैव तत्पर राहू, असे आश्वासन दिले.
तसेच ‘धागा शौर्याचा, राखी अभिमानाची’ या उपक्रमांतर्गत राजाराम शेठ विद्यालय भांडुप येथील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना पत्र लिहून साजरा केला. या वेळी सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रमेश खानविलकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर आणि शाळेमधील शिक्षक आणि कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92828 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..