राज्यातून खाद्यतेलाचे २७० नमुने गोळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातून खाद्यतेलाचे २७० नमुने गोळा
राज्यातून खाद्यतेलाचे २७० नमुने गोळा

राज्यातून खाद्यतेलाचे २७० नमुने गोळा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्याच्या अन्न व औषध प्रशासना (एफडीए)चे अधिकारी खाद्यतेलातील भेसळीविरोधात मोहीम राबवत आहेत. त्यात राज्यभरातील वेगवेगळ्या खाद्यतेलांचे नमुने प्रयोगशाळांमध्ये पाठवून सणांच्या हंगामापूर्वी कमी दर्जाच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत एफडीएने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून खाद्यतेलांचे २७० नमुने गोळा केले आहेत. कमी दर्जाच्या खाद्यतेलांवर एफडीएकडून कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
दैनंदिन जीवनात विविध अन्नपदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सर्व नागरिकांना चांगल्या प्रतीचे खाद्यतेल मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहिमांमधून खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील खाद्यतेल सर्वेक्षण मोहिमेमध्ये एकूण २७० नमुने घेण्यात आले.
‘ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात विविध सण साजरे होणार असल्याने दुकाने आणि हॉटेलमध्ये बनवल्या जाणाऱ्या मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांचा दर्जा तपासणे गरजेचे आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ, मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल ओळखणे आणि तपासणे, यावर भर दिला जातो,’ असे शशिकांत केंकरे, सहआयुक्त, अन्न (बृहन्मुंबई विभाग) यांनी सांगितले. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या १५ दिवसांच्या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्येक जिल्ह्यातून नमुने गोळा करत आहेत आणि ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवत आहेत.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92835 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..