बॅक कर्मचारी महिलेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅक कर्मचारी महिलेची आत्महत्या
बॅक कर्मचारी महिलेची आत्महत्या

बॅक कर्मचारी महिलेची आत्महत्या

sakal_logo
By

वाडा, ता. १३ (बातमीदार) : जव्हार अर्बन बॅंक कुडूस शाखेमध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेने शनिवारी (ता. १३) दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. अश्विनी दिनेश पाटील (३२) असे या महिलेचे नाव आहे.
कुडूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यातील पारोळ येथील मूळ रहिवासी असलेल्या अश्विनी या जव्हार अर्बन बॅंकेत लिपिक म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या कुडूस येथील राई रामा इमारतीत पती, मुलगा व आई यांच्यासमवेत राहत होत्या. शनिवारी सुट्टी असल्याने त्या घरात एकट्याच होत्या. दुपारच्या सुमारास त्यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92837 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..