पालघर पोलीस दलाकडून अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर पोलीस दलाकडून अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन
पालघर पोलीस दलाकडून अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन

पालघर पोलीस दलाकडून अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन

sakal_logo
By

पालघर पोलिस दलाकडून अमृत महोत्सवी दौडचे आयोजन

पालघर, ता. १४ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त पालघर जिल्हा पोलिस दलातर्फे दहा किलोमीटर अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सनदी अधिकाऱ्यांनी ही दौड पूर्ण केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलिस दलातर्फे सकाळी ६ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय, मोरेकुरण रोड, जिल्हा मुख्यालय, कोळगाव, पालघर येथून दहा किलोमीटर अमृत महोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, अपर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपजिल्हाधिकारी संजीवन जाधवर, तसेच जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
ही दौड पोलिस अधीक्षक कार्यालय येथून पालघर चाररस्ता ते पालघर रेल्वे स्टेशन ते माहीम वळण नाका व परत चाररस्ता मार्गे पोलिस अधीक्षक कार्यालय येथे समाप्त करण्यात आली. यात शासकीय अधिकारी व अंमलदार, शाळेतील विद्यार्थी, एन.सी.सी. विद्यार्थी, नागरिक असे एकूण ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92847 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..