पैसे उकलण्याच्या उद्देशानेच मुलीचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसे उकलण्याच्या उद्देशानेच मुलीचे अपहरण
पैसे उकलण्याच्या उद्देशानेच मुलीचे अपहरण

पैसे उकलण्याच्या उद्देशानेच मुलीचे अपहरण

sakal_logo
By

वाडा, ता १४ (बातमीदार) : वाडा शहरातील अशोक वन परिसरातील स्वरा शेलार या शाळकरी मुलीचे अपहरण गेल्या शुक्रवारी सायंकाळी झाले होते. अवघ्या बारा तासांत वाडा पोलिसांनी याचा शोध लावत एका आरोपीला बेड्या ठोकल्या, तर त्याचे दोन साथीदार फरारी झाले असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, पैसे उकलण्याच्या उद्देशानेच हे अपहरण केले असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
स्वरा ही मुलगी वाडा येथील पी. जे. हायस्कूलमध्ये सहावीत शिकत असून गेल्या शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर ही मुलगी घरी जात असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या समीर ठाकरे व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी तिचे अपहरण केले. या प्रकरणाचा वाडा पोलिसांनी तपास करून अवघ्या १२ तासांच्या आत ऐनशेतमधील एका शेतघरातून स्वराची सुखरूप सुटका केली. यादरम्यान, पैसे उकलण्याच्या उद्देशानेच स्वराचे अपहरण केले असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92855 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..