स्वातंत्र्य लढ्यातील पालघरमधील हुतात्म्यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य लढ्यातील पालघरमधील हुतात्म्यांना अभिवादन
स्वातंत्र्य लढ्यातील पालघरमधील हुतात्म्यांना अभिवादन

स्वातंत्र्य लढ्यातील पालघरमधील हुतात्म्यांना अभिवादन

sakal_logo
By

पालघर, ता. १४ (बातमीदार) : ब्रिटिशांविरोधातील चले जाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच यानिमित्त पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चुरी (मुरबे) यांना १४ ऑगस्ट १९४२ रोजी हौतात्म्य आले होते. त्यामुळे आज या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या नातेवाईकांसह पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, प्रांताधिकारी धनाजी तुळसकर, तहसीलदार सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92858 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..