तलासरीत झोपडीत सापडला दमण बनावटीचा साठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलासरीत झोपडीत सापडला दमण बनावटीचा साठा
तलासरीत झोपडीत सापडला दमण बनावटीचा साठा

तलासरीत झोपडीत सापडला दमण बनावटीचा साठा

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील सूत्रकार गावच्या हद्दीतील इभाड पाड्यालगतच्या डोंगरावर पत्राच्या झोपडीत साठवलेला दमण बनावटीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत आठ लाख रुपये किमतीचा १०७ बॉक्समधून ९४३ लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तलासरी तालुक्यातील सूत्रकार गावच्या हद्दीतील इभाड पाड्यालगतच्या डोंगरावर एका पत्र्याच्या झोपडीत नंद्या अंधेर नामक इसमाने दमण बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा करून ठेवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. शुक्रवारी दुपारी भरारी पथकाने छापा टाकून दारूबंदीच्या गुन्हेकामासाठी पत्र्याच्या झोपडीची तपासणी केली असता झोपडीमध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला दमण बनावटीच्या विविध ब्रँडचे विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईदरम्यान ९४३ बल्क लिटर दमण बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92859 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..