मनोरजवळ टँकर उड्डाणपूलावरून कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोरजवळ टँकर उड्डाणपूलावरून कोसळला
मनोरजवळ टँकर उड्डाणपूलावरून कोसळला

मनोरजवळ टँकर उड्डाणपूलावरून कोसळला

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने टँकरला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात मुंबई मार्गिकेवरील भरधाव वेगातील ट्रक खड्ड्यांमध्ये आदळून अनियंत्रित झाल्याने दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवरील टँकरला धडकला. ट्रकच्या धडकेमुळे टँकर उड्डाणपुलावरून खाली कोसळला; तर ट्रक रस्त्यावर कलंडला होता. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
उड्डाणपुलावरून खाली पडलेल्या टँकरमध्ये डिझेलनिर्मितीसाठी लागणारे क्रूड ऑइलसदृश रसायन असल्याची माहिती चालकाने दिली. अपघातस्थळालगत वाहतूक पोलिस मदत केंद्र असल्याने वाहतूक पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खासगी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली, अशी माहिती दुर्वेस वाहतूक मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकूर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92861 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..