स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ ठिकाणी कोविड लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ ठिकाणी कोविड लसीकरण
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ ठिकाणी कोविड लसीकरण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ ठिकाणी कोविड लसीकरण

sakal_logo
By

भाईंदर, ता. १४ (बातमीदार) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाने १५ ऑगस्टला शहरातील ७५ ठिकाणी कोविड लसीकरण सत्र आयोजित केले आहे. या केंद्रांवर बारा वर्षे वयावरील सर्व नागरिकांना कोविड लशीचा पहिला, दुसरा व बूस्टर डोस दिला जाणार आहे.
टेंभा येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय, महापालिकेचे मिरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय, तसेच दहा आरोग्य केंद्रे अशा एकूण बारा ठिकाणी नियमितपणे कोविड लसीकरण सुरू आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्टला प्रथमच ७५ ठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यात उत्तन परिसरात चार, भाईंदर पश्चिम भागात सहा, भाईंदर पूर्व भागात वीस, मिरा रोड भागात अठ्ठावीस आणि काशिमिरा भागात पाच ठिकाणी अतिरिक्त लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याठिकाणी सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिरा-भाईंदर शहरात आतापर्यंत ७ लाख २९ हजार ५०८ नागरिकांनी कोविडचा पहिला डोस, ७ लाख ८ हजार २९१ नागरिकांनी दुसरा डोस, तसेच ९४ हजार ७१२ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. शहरात सध्या कोविडचे २१२ रुग्ण सक्रिय आहेत; तर आतापर्यंत कोविडमुळे १४०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92866 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..