स्वातंत्र्याचा जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याचा जल्लोष
स्वातंत्र्याचा जल्लोष

स्वातंत्र्याचा जल्लोष

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : कोविडमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत घरोघरी ध्वज डौलाने फडकत आहेच. पण त्यासोबतच आकर्षक विद्युत रोषणाई आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्‍या भरगच्च मेजवानीचे आयोजन विविध संस्था, आस्थापनांकडून केले जात आहे. त्यामुळे ठाण्यासह संपूर्ण जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषाचे सुखदायी वातावरण अनुभवण्यास मिळत आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ध्वजवंदनाच्‍या मुख्य शासकीय समारंभानंतर नियोजन भवनच्या सभागृहात रविंद्र चव्हाण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे.

सन्मान, पुरस्कार
महा आवास अभियानमधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (एनटीएस) इयत्ता दहावी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करणार आहेत. तसेच ठाणे मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांना गुणवत्ता पूर्ण सेवेबाबत राष्ट्रपती सुधारसेवा पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

निर्धूर चुलीचे वाटप
ठाणे जिल्हा रुग्णालय महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्राचे वाटप, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महादिवा सुधारित निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन
मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांबाबत माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देखील करण्यात येणार आहे.

कडेकोट पोलिस बंदोबस्त
स्वातंत्र्य दिनाचा हा जल्लोष आनंदात साजरा व्हावा यासाठी ठाणे पोलिसही सज्ज झाले आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92881 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..