राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वछता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वछता मोहीम
राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वछता मोहीम

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वछता मोहीम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सागरी महामंडळाने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वछता मोहीम हाती घेतली आहे. ही स्वछता मोहीम १७ ऑगस्टपर्यंत चालणार असून या उपक्रमात महाराष्ट्र सागरी महामंडळाचे एक हजारपेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग असणार आहे.

महाराष्ट्राला जवळपास ७२० किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या सागरी किनाऱ्याच्या सान्निध्याने सुंदर हिरवा आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देत असतात. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता महत्त्वाची असल्याने ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने महाराष्ट्र सागरी महामंडळाने सागरी किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेत सागरी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, समुद्र किनाऱ्यावर छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकही सहभागी होत आहेत. ही स्वच्छता मोहीम १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालणार आहे. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना १३ ऑगस्ट २०२२ रोजी अलिबाग समुद्र किनारी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे स्थानिक लोकांच्या सहभागातून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. आता गणपतीपुळे, रत्नागिरी, काशीद, गिरगाव, वेळास गुहागर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मुरुड गणेशगुलेसारखे अनेक समुद्र किनारे स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी महामंडळाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92884 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..