देशाच्या उज्वल भविष्यासाठी नवी मुंबईकरांची धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाच्या उज्वल भविष्यासाठी नवी मुंबईकरांची धाव
देशाच्या उज्वल भविष्यासाठी नवी मुंबईकरांची धाव

देशाच्या उज्वल भविष्यासाठी नवी मुंबईकरांची धाव

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना महापालिकेने भरवलेल्या मॅरेथॉनला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी ‘चला धावू या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ असा संदेश देत तीन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.
नवी मुंबई महापालिका व नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमाने पाम बीच मार्गावर ‘अमृतमहोत्सव रन’ घेण्यात आली. महापालिका मुख्यालयासमोरील पाम बीच रस्त्यावर या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. मुख्यालयापासून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला धावपटूंनी हातात तिरंगा घेत आणि भारतमातेचा जयघोषात सुरुवात केली. या वेळी १० व ५ किलोमीटरच्या रनमध्ये एक हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होताना देशाभिमान अभिव्यक्त केला. या गटांत पुरुष धावपटूंमध्ये गावित, संकेत जाधव व तुषार पवार हे प्रथम तीन क्रमांकांचे मानकरी ठरले; तर महिला धावपटूंमध्ये अर्चना पाटील यांनी प्रथम, अश्विनी गभाळे यांनी द्वितीय व नेहा बोरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. १० कि.मी. अंतराच्या रनमध्ये चार वयोगटांमध्ये प्रत्येकी तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच पाट कि.मी. अंतराच्या खुल्या रनमध्ये पहिल्या तीन क्रमांकाच्या महिला व पुरुष धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. या अमृतमहोत्सवी रनमध्ये युद्धात लढणाऱ्या सैनिकांचे पोषाख करून आलेला एक धावपटू सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92887 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..