बाप्पाच्या आगमनाने मंडळांमध्ये नवचैतन्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाच्या आगमनाने मंडळांमध्ये नवचैतन्य
बाप्पाच्या आगमनाने मंडळांमध्ये नवचैतन्य

बाप्पाच्या आगमनाने मंडळांमध्ये नवचैतन्य

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४  ः गेल्या दोन वर्षांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा चुकलेला बाप्पाचा आगमन सोहळा आजच्या रविवारी पुन्हा एकदा मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला. कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या मुक्तीनंतरचे पहिलेच वर्ष असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला होता. लागोपाठ जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे तसेच पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईतील मानाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत आज बाप्पा दाखल झाले.
रविवारी तब्बल १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या मूर्तींचे आगमन झाले. या आगमनासाठी मुंबईतील विविध गणेश कार्यशाळांच्या ठिकाणी छोटेखानी मिरवणुकाही निघाल्या. दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. मुंबई शहर, मुंबई पूर्व उपनगर तसेच पश्चिम उपनगरातील गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बाप्पाचे आगमन आजच्या दिवशी करण्यात आले. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे मंडळांनी या दिवसाची आगमनासाठी निवड केली आहे. आज बाप्पाचे आगमन झालेल्या मंडळांमध्ये उमरखाडीचा राजा, काळाचौकीचा महागणपती, मुंबादेवीचा गणराज, परळचा महाराजा, मुंबईचा महाराजा यांसारख्या मंडळांचा समावेश आहे.
...
२१ ऑगस्टला सर्वाधिक पसंती
सर्वाधिक गणेशोत्सव मंडळांच्या पसंतीचा रविवार २१ ऑगस्ट आहे. या दिवशी ३३ गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होणार आहे. फोर्टचा राजा, कोलभाट लेनचा राजा, ताडदेवचा राजा, डोंगरीचा राजा, कुलाब्याचा सम्राट, अंधेरीचा विघ्नहर्ता, अभ्युदयनगरचा राजा यांसारख्या गणेशोत्सव मंडळांनी येत्या रविवारी आपला गणेशमूर्ती आगमन सोहळा आयोजित केला आहे. ७ ऑगस्टला कुर्ल्याचा मंगलमूर्ती, कुर्ल्याचा राजा; तर १३ ऑगस्टला मुंबईच्या युवराजाचा आगमन सोहळा पार पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92891 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..