गणेशमंडळांना नोंदणी शुल्क माफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमंडळांना नोंदणी शुल्क माफ
गणेशमंडळांना नोंदणी शुल्क माफ

गणेशमंडळांना नोंदणी शुल्क माफ

sakal_logo
By

पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पनवेल महापालिकेतर्फे ‘गणेशोत्सव २०२२’साठी गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी, नोंदणी आणि अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी (ता. ११) जाहीर केले.
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (ता. ८) बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांकडून शुल्क माफ करावे, अशी मागणी मंडळांनी केली होती. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाकडून नुकत्याच आलेल्या पत्रानुसार मोहरम, दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त कायदा, सुव्यवस्था आणि इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार गणेशोत्सव मंडळांकडून महापालिका आकारत असलेले नोंदणी शुल्क माफ करण्याचे कळवण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप परवानगी, नोंदणी आणि अग्निशमन शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपर्क साधण्यासाठी
पनवेल महापालिकेने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवानगी दिली आहे. यासाठी http://smartpmc.in/Login हे संकेतस्थळ तयार केले आहे. गणेश मंडळांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मंडळांनी अधिक माहितीसाठी महापालिकेच्या १८००-२२७-७०१ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी panvelcorporation@gmail.com, ०२२-२७४५८०४०/४१/४२ , व्हॉट्सअॅप ९७६९०१२०१२ यावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92892 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..