तोतया पोलिसांकडून ओमानी नागरिकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोतया पोलिसांकडून ओमानी नागरिकाची फसवणूक
तोतया पोलिसांकडून ओमानी नागरिकाची फसवणूक

तोतया पोलिसांकडून ओमानी नागरिकाची फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या ओमानी कुटुंबाची तोतया पोलिस अधिकारी बनून दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुल्ला (वय ४१) हा ओमानचा नागरिक १० ऑगस्टला पत्नी आणि वृद्ध आईवडिलांसोबत वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आला होता. अब्दुल्लाचे आई-वडील मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा व्याधींनी ग्रस्त आहेत. शुक्रवारी १३ ऑगस्टला रात्री १०.३० च्या सुमारास अब्दुल्ला त्याची पत्नी व कुटुंबीयांसह औषध खरेदीसाठी हॉटेलबाहेर पडले. अर्ध्या तासानंतर त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारने अडवले, ज्यात एका महिलेसह चार प्रवासी होते. कारमधील एका व्यक्तीने त्यांना हिंदीत विचारले, की कुटुंबाला कोणती भाषा सोयीस्कर आहे. त्यांनी ती अरबी असल्याचे उत्तर दिल्यावर दुसरा प्रवासी त्यांच्याशी अरबी भाषेत बोलू लागला. त्यानंतर त्याने पोलिस असल्याचा दावा केला आणि अब्दुल्लाने आपल्या जवळ अमली पदार्थ ठेवल्याचा आरोप केला. कुटुंबाला त्यांचे सामान तपासणीसाठी सुपूर्द करण्यास सांगण्यात आले. या सर्व घटनांनी धक्का बसलेल्या अब्दुल्लाच्या पत्नीने घाबरून तोतया पोलिसांना तिची बॅग तपासण्याची परवानगी दिली. त्यानंतर बॅग हिसकावून गाडी घेऊन ते कुलाबा मार्केटच्या दिशेने पसार झाले. ती कार खासगी कंपनीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे दिसून येते, असे कुलाबा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g92901 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..